सैन्यदलासह देशाचा लौकिक वाढविणार : लेफ्ट. सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:42 PM2019-12-29T23:42:15+5:302019-12-29T23:43:07+5:30

गावाने केलेला सत्कार हा माझा कौटुंबिक सत्कार असून, हे क्षण मला सतत प्रेरणा देत राहतील. त्यातून आपल्या गावाचे नाव सैन्यदलासह देशात उज्ज्वल करून लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन, असे प्रतिपादन लेफ्टनंट प्रणव सोनवणे यांनी केले.

To increase the country's popularity with the military: Lieut. To sleep | सैन्यदलासह देशाचा लौकिक वाढविणार : लेफ्ट. सोनवणे

मनेगाव येथील भूमिपुत्र लेफ्टनंट प्रणव सोनवणे यांचा नागरी सत्कार करताना मविप्रचे संचालक हेमंत वाजे. समवेत बाबूराव गोवर्धने, कृष्णाजी भगत, सरपंच स्वप्नाली सोनवणे, संजय सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ.

Next

सिन्नर : गावाने केलेला सत्कार हा माझा कौटुंबिक सत्कार असून, हे क्षण मला सतत प्रेरणा देत राहतील. त्यातून आपल्या गावाचे नाव सैन्यदलासह देशात उज्ज्वल करून लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन, असे प्रतिपादन लेफ्टनंट प्रणव सोनवणे यांनी केले.
तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्रचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत, माजी संचालक बाबूराव गोवर्धने, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, सरपंच स्वप्नाली सोनवणे, अ‍ॅड. संजय सोनवणे, अ‍ॅड. सी. डी. भोजने, त्र्यंबक सोनवणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, मुख्याध्यापक शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे उपस्थित होते. अण्णासाहेब सोनवणे, धोंडवीरनगरचे पोलीसपाटील बाळासाहेब पवार यांचाही गौरव करण्यात आला. प्रा. विष्णुपंत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: To increase the country's popularity with the military: Lieut. To sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.