दिंडोरीतील पावसामुळे धरणसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 10:30 PM2021-09-28T22:30:51+5:302021-09-28T22:32:51+5:30
दिंडोरी : शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळीपासून पावसाने पुनरागमन केल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
दिंडोरी : शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळीपासून पावसाने पुनरागमन केल्याने तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
दिंडोरी तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ओझरखेड, करंजवन व तिसगाव धरण भरलेले नसल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र सोमवारी (दि.२७) सायंकाळी पावसाचे पुनरागमन झाले. त्यात पूर्व भागात जोरदार पाऊस झाला, मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र विविध नदीनाल्यांना पूर येत धरणसाठा काहीसा वाढला आहे.
दिंडोरी तालुका झालेला पाऊस व धरणसाठा
मंगळवार सकाळी ६ पर्यंतचा धरणसाठा १) पालखेड ९९.१५) सांडवा ३७२ क्युसेस २) करंजवण (७२.१४) ३) वाघाड (१००) सांडवा २०४ क्युसेस ४) पुणेगाव (९५.८१) सांडवा ४५० ५) ओझरखेड (५५.२६) ६) तिसगाव (४२.६४)
पाऊस टक्केवारी (मंडळनिहाय)
मोहाडी - १०.० मि. मी. उमराळे - ०७.७ मि. मी. कोशिंबे - २८.० मि. मी. ननाशी - ३७.० मि. मी. वरखेडा - १५.० मि. मी. वणी - ४७.० मि. मी. दिंडोरी - १३.० मि. मी. लखमापूर - ०४.० मि. मी. रामशेज - १५.० मि. मी.