सुकामेव्याच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 05:10 PM2019-11-21T17:10:13+5:302019-11-21T17:14:42+5:30
थंडीचा पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याच्या मागणी केली जात आहे. यात खारीकचे दर ३७० कलम हटविल्यामुळे बाजारात खारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
नाशिक : शहरात थंडीचे आगमन होत असतांनाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याच्या मागणी केली जात आहे. यात खारीकचे दर ३७० कलम हटविल्यामुळे बाजारात खारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापासूनच शहरातील तापमान घसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या एक दोन दिवसांपासून तापमान सतत घसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात पहाटेच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य संवर्धनासाठी उबदार कपडयांबरोबरच सुकामेवा खरेदी करण्यासही प्रारंभ केला आहे. खास करुन डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुकामेव्यास नाशिकमध्ये मोठी मागणी असते. सुकामेव्याच्या खरेदीला विशेषत: डिसेंबरमध्ये प्रतिसाद मिळतो. परंतु, यंदा डिसेंबरमध्ये जाणवणाºया थंडीचे आगमन नोव्हेंबर महिन्यातच जाणवु लागले आहे. सुकामेव्याला आरोग्यसंवर्धासाठी विषेश महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात सुकामेव्याची मागणी वाढु लागली आहे.
३७० कलमामुळे खारीक महागली
केंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी काश्मिरमधे लावण्यात आलेला ३७० कलम हटविल्यामुळे पाकिस्तानमधुन भारतात काही गोष्टींची निर्यात बंद करण्यात आली होती. खारीक ही मुख्यत: पाकिस्तानमधुन भारतात येत असते. मात्र सध्या पाकिस्तानची खारीक भारतात येणे बंद झाल्याने इतर देशांतुन खारीक आयात करावी लागत आहे. त्यामुळे खारीकचे दर मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पटीने वाढली आहे.
थंडीची चाहुल लागल्यामुळे ग्राहक सुकामेव्याच्या खरेदीला पसंती देत आहे. यात खारीक, खोबरे, काजु, बदाम, मनुका यांना मोठी मागणी आहे. मात्र येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याने सुकामेव्याच्या मागणीत अधिकच वाढ होणार आहे.
जयंत पटेल, सुकामेवा विक्रेते
असे आहेत दर (प्रतिकिलो रुपये प्रमाणे)
खारीक : २५० ते ३००
अक्रोड : ६५० ते ७५०
बदाम : ७५० ते ९००
काजु : ८०० ते ११००
काळा मनुका : ४०० ते ६००
साधा मनुका : १८० ते २४०
खारे पिस्ता : १००० ते १४००
अंजीर : ९०० ते १३००
डिंक : १८० ते २००
खोबरे: २०० ते २२०
साधे खजुर : १२० ते १५०
काळे खजुर : ३०० ते ३४०