खोडेमाळा भागात डेंग्यू, चिकुनगुण्याच्या रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:42 AM2018-07-25T00:42:14+5:302018-07-25T00:42:30+5:30
जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको : जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रभाग सभापतींसह प्रभागाच्या नगरसेवकांनी प्रभागात पाहणी करीत कामकाज करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. सिडको भागात कामकाज करणाºया मनपाच्या पेस्टकंट्रोल (मलेरिया) विभागावर कोणाचाही धाक नसल्याने या विभागाचे कामकाज मनमानी सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडकोत डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ व कचºयाचे ढीग साचले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील वर्षी तुळजाभवानी चौकात एकाच भागात पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या वतीने त्या भागात स्वच्छता मोहीम राबवून धूर व औषध फवारणी केली होती. यंदाच्या वर्षीही मनपा अशा ढिसाळ कारभारामुळे खोडेमळा भागात चिकुनगुण्या व डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेले रुग्णं आढळले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असून, खोडेमळा परिसरात डेंग्यू व चिकनगुनिया आजाराचे तीन रुग्णं आढळल्याने याबाबत मंगळवारी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर तसेच प्रभागाचे नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी अधिकाºयांना बरोबर घेत सुमारे दोन तास पाहणी दौरा केला. पावसामुळे आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी साफसफाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने ठिकठिकाणी घाण व कचºयाचे ढीग झालेले दिसून येत असून, यामुळे सिडको भागात साथीचे रोग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. डासांचे प्रमाणही वाढले असताना संबंधित विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डेंग्यूसदृश, चिकुनगुण्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगरसेवकांची ‘चिखल’वारी...
प्रभाग क्रमांक २४ मधील खोडमळ परिसरात डेंग्यूसदृश व चिकुनगुण्या आजाराचे रुग्ण आढळल्याने मंगळवारी सभापती हर्षा बडगुजरसह प्रभागाचे नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी प्रभागात पाहणी दौरा केला. या पाहणी वेळी खोडमळा परिसरातील मोकळ्या जागेत वाढलेल्या झाडांच्या फाद्यांचा पालापाचोळा तसेच साचलेले पाणी यावर मनपाच्या वतीने फवारणी करण्यात आली. तसेच पाण्याच्या व्हॉल्व्हजवळ झालेला मोठा खड्डा बुजविण्यात आला. यानंतर नगरसेवकांनी त्यांचा मोर्चा हा कर्मयोगीनगरजवळील आव्हाड हॉस्पिटल परिसरात नव्याने वाढलेल्या मेरीडियानगोल्ड व परिसरातील रस्ता तसेच पांगरेमळा, खोडेमळा या भागातील रस्ते पाहणी केली.
मनपा अधिका-यांची सारवासारव
खोडेमळा परिसरात डेंग्यूसदृश व चिकनगुनिया रुग्ण आढळल्यानंतर सभापती हर्षा बडगुजर व नगरसेवक कल्पना पांडे, राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे यांनी खोडेमळा व परिसराची पाहणी केल्याने मनपा अधिकारी व कर्मचाºयांनी या भागात कामकाज करून सारवासारव केल्याचे चित्र बघावयास मिळाले.