प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:20 AM2018-07-26T00:20:23+5:302018-07-26T00:20:39+5:30

प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगर, के. जे. मेहता परिसरात भुरट्या चोºया वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Increase in devastated thieves in Sadguru village of ward no. 20 | प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

Next

नाशिकरोड : प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगर, के. जे. मेहता परिसरात भुरट्या चोºया वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हसोबा मंदिर, बिग बाजार, के. जे. मेहता शाळा, सद्गुरूनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओढून चोरून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तसेच या भागातील शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेसजवळ टवाळखोर युवक हे युवती व विद्यार्थिनींची छेडछाड करत असतात. असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनसे नाशिकरोड अध्यक्ष साहेबराव खर्जुल, नाशिक शहर संघटक नितीन पंडित, महिला शहर अध्यक्ष रिना सोनार, शुभम बारी, अ‍ॅड योगेश शिरसाठ, मीरा आवारे, सीमा बारी, प्रभाकर सांगळे, सुनील पाटोळे, रवींद्र पोरजे, बाळासाहेब पुंड आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Increase in devastated thieves in Sadguru village of ward no. 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.