द्राक्ष निर्यातीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:05 PM2019-04-09T23:05:53+5:302019-04-09T23:07:15+5:30
नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे एक लाख टनाहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लंडच्या बाजारपेठेत निर्यात झाली होती, तर एकट्या रशियात सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, श्रीलंका, बांगलादेश, मध्य-पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरू असून, एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनांचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्ष युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घकाळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊनही यंदा द्राक्षांची आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती द्राक्षांवर कोसळली नाही. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन वाढलेले असताना देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण पहायला मिळाले.पेरू देशाच्या द्राक्षांसोबत प्रथमच स्पर्धा युरोपीय बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची स्पर्धा दक्षिण आफ्रिका व चिली यांसारख्या देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या द्राक्षांसोबत असते. यंदा त्यात पहिल्यांदाच पेरूची भर पडली. फेब्रुवारीपर्यंत एकट्या पेरूमधून युरोपात
१५ हजार टनांची द्राक्ष निर्यात झाली होती. त्याशिवाय भारतातून दर आठवड्याला होणाऱ्या कंटेनरच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होत
होती. या स्थितीत निर्यातक्षम द्र्राक्षांच्या दरातही यंदा ३ ते ४ युरोंनी घट झाली होती. परंतु आता परिस्थिती सुधारली असून, लेट हार्व्हेस्टिंग झालेल्या मालाला चांगली मागणी मिळत आहे. द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, जवळपास ८० टक्के हंगाम आटोपला आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत द्राक्षांच्या दरात ४० ते ५० टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दर वाढल्यामुळे परराज्यातून मागणी काही प्रमाणात स्थिरावली आहे. द्राक्षांना प्रतिकिलोला किमान ३५ ते ४५ व सरासरी ४० रुपये दर मिळाला असून, अखेरच्या टप्प्यात निर्यातक्षम द्राक्षांना ९० रुपयांपर्यंतही दर मिळत आहे. येत्या काही कालावधीत हा दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे.
- माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ