इंधन दरवाढ करा, दारूचे दर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 11:11 PM2021-02-09T23:11:43+5:302021-02-10T00:47:56+5:30

नाशिक : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती वापराचे गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारकडून सातत्याने वाढ केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ...

Increase fuel prices, reduce alcohol prices | इंधन दरवाढ करा, दारूचे दर कमी करा

डावी आघाडीच्यावतीने आंदोलन करताना डॉ. डी. एल. कराड, राजु देसले, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे आदी.

googlenewsNext

नाशिक : पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती वापराचे गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारकडून सातत्याने वाढ केली जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी डाव्या आघाडीच्यावतीने अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर उपरोधिक आंदोलन करून पेट्रोलचे दर शंभर रूपये करा परंतु दारूचे दर मात्र कमी करा अशी मागणी करण्यात आली.

शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरच मद्य विक्रीचेही दुकान असल्यामुळे डाव्या आघाडीने आंदोलनासाठी ठिकाण निश्चित केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात माकप, शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले.
             त्यात म्हटले आहे की, पेट्रोल शंभर रूपयांपर्यंत पोहोचले असून, अबकारी कर कमी करून त्यावर कृषी अधिकार कराची आकारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी दिशाभूल करीत आहे. वीज बिलाबाबतही हाच प्रकार सुरू असून, भाजप या प्रश्नावर खोटे आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने वीज बिल कायदा आणून सर्व सामान्यांना १०० युनिट पर्यंतची सवलत रद्द करण्याच्या तरतुदी करीत आहे. वीज व्यवसायाचे खासगीकरण करून अदाणी-अंबानीच्या ताब्यात देण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

महागाई विरोधात सत्ताधाऱ्यांनी खोटे आंदोेलन करणे बंद करून पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी अशी मागणी करतानांच सत्ताधाऱ्यांचे या संदर्भातील एकूणच वागणे पाहता, पेट्रोल-डिझेलची दरवाढ शंभर रूपये करा, घरगुती गॅस सिलिंडर एक हजार रुपये करा व दारूचे दर कमी करण्याची वेळ सरकारने आणल्याचेही म्हटले आहे. या आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, तानाजी जायभावे, दत्तु तुपे, समीर शिंदे, निवृत्ती कसबे, नाजिम काझी, सीताराम ठोंबरे, मनिष बस्ते आदी सहभागी झाले होते.

Web Title: Increase fuel prices, reduce alcohol prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.