गॅस्ट्रोच्या रु ग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:54 PM2019-10-18T23:54:06+5:302019-10-18T23:54:33+5:30
कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीने डोकेवर काढल्याने १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून उपचार करत आहे. तर गंभीर रु ग्णांवर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करु न उपचार सुरू असून गुक्रवारी परिस्थिती नियंत्रणात होती.

पुनद धरणातून सटाणा शहरासाठी पाइपलाइनने पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या जलवाहिनीचे खोदकाम करतांना ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे सावरपाडा गावात पाणीपुरवठा करणारी गावांतर्गत जलवाहिनी फुटली. व या ठिकाणी खड्डा तयार होऊन दुषित पाणी सावरपाडा गावात घरोघरी पोहचले. यामुळे गावातील १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. गुरुवारी (दि.१७) गॅस्ट्रोचे १०० रु ग्ण होते. तर शुुक्रवारी (दि.१८) त्यात २० नवीन रु ग्ण दाखल झाले. यामधील ६ रु ग्णांना नाशिक जिल्हा रु ग्णालयात, तर १४ रु ग्णांना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुरुवारी ६० रु ग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आजमितीस सावरपाडा येथील मराठी शाळा आरोग्य केंद्रात १७, नाशिक उपजिल्हा रु ग्णालयात ७, कळवण उपजिल्हा रु ग्णालयात ३६ रु ग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
आज रु ग्णसंख्या कमी झाली आहे. तर जुने ६० रु ग्ण शंभर टक्के बरे झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गावातील परिस्स्थिती लक्षात घेता येथे आरोग्य यंत्रणा २४ तास सज्ज आहे.
- डॉ. सुधीर पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, कळवण.