कांदा चाळीचे पंचनामे करून अनुदान वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:28 PM2019-01-05T22:28:34+5:302019-01-05T22:29:07+5:30
कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, प्रशांत गायकवाड यांनी, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी कांदाप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी स्थितीत शेतकºयांनी कांद्याचे उत्पादन घेतले. प्रसंगी टँकरच्या पाण्यावर पीक जगवले. मात्र कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यादरम्यान दिवाळी व इतर सण, उत्सव असल्याने अनेक बाजार समित्या काही दिवस बंद होत्या. शेतकºयांनीही कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. कांद्याचा एकरी उत्पादन खर्च ४० हजार रुपयांपर्यंत येतो. सध्या बाजारात कांद्याला मिळणारे दर पाहता शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी तो चाळींमध्ये साठवून ठेवला आहे.
हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे. त्यामुळे योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले व चाळीत कांदा साठवून ठेवलेले शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात. कांद्याला अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे दर आणखी गडगडले आहेत. त्यामुळे सरकारने फेब्रुवारी २०१९पर्यंत विक्री केल्या जाणाºया कांद्याला किमान पाच रु पये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उन्हाळी कांदा संपेपर्यंत अनुदान द्या; सरकारकडून तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने संताप कळवण तालुक्यातील गेल्या वर्षी पिकवलेला उन्हाळी (गावठी) कांदा शेतकºयांकडील संपत नाही तोपर्यंत शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाकरे यांच्याकडे लवकरच शेतकºयांची
कैफियत मांडण्यात येणार असल्याचे कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांनी सांगितले.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने
१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना तुटपुंजे असे २ रु पये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानातून शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. कांदा
विक्री केल्याचा कालावधी अतिशय कमी आहे.