अहिल्या धरणावरील सांडव्याची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:20+5:302021-06-16T04:20:20+5:30
त्र्यंबकेश्वर शहरातील पाच आळी, भांगरे गल्ली, मेनरोड आदी भागांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अहिल्या धरणातून पाणी सोडले जाते. या ...
त्र्यंबकेश्वर शहरातील पाच आळी, भांगरे गल्ली, मेनरोड आदी भागांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अहिल्या धरणातून पाणी सोडले जाते. या धरणाची एकसष्टी मागील वर्षीच पूर्ण झाली आहे. आतापर्यंत फक्त दोन वेळा या धरणातील गाळ काढला आहे. गायधनी या पाणीपुरवठा सभापती असताना धरणातील गाळ काढण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी धरणाची उंची वाढवण्यात आली; पण सांडवा जसा आहे तसाच ठेवला. सांडव्याची उंची वाढवण्यासाठी सिंचन विभागाची त्यावेळीच परवानगी घेतली गेली असती तर त्याचा शहराला फायदा झाला असता. सध्या सांडव्याच्या गळती दुरुस्तीचे काम सुरू आहे. धरणातील गाळ पुनश्च काढणे गरजेचे बनले आहे. सांडव्याची उंची वाढली असती तर शहराला आठ महिने पुरणारे पाणी दहा महिने पुरले असते. परिणामी अंबोली धरणावरील ताण कमी होऊन शहराला बारमाही सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला असता. सदर उंची वाढीसाठी सिंचन विभागाकडे पाठपुरावा करून त्याचे काम होऊ शकले असते. परंतु, आता पावसाळा सुरू झाल्याने या कामाला परवानगी दिली जाणार नाही. त्याला सर्वस्वी नगर परिषदेचा कारभार जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. पाणीपुरवठा सभापतीपद हे निव्वळ शोभेचे आहे काय, असा सवालही नागरिकांनी केला आहे.
कोट....
अहिल्या धरणावरील सांडव्याची उंची वाढवायची असेल तर जलसिंचन विभागाची परवानगी
घेणे गरजेचे आहे. आता जून महिना लागला असल्याने परवानगी मिळणार नाही.
- अभिजित इनामदार, शहर अभियंता
फोटो- १४ अहिल्या सांडवा
===Photopath===
140621\14nsk_37_14062021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ अहिल्या सांडवा