हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:05 PM2020-05-21T21:05:26+5:302020-05-21T23:24:57+5:30

मालेगाव : येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, सायलेंट कॅरियर तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती रोजच्या रोज घोषित करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Increase High Risk Contact Tracing! | हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा !

हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा !

Next

मालेगाव : येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, सायलेंट कॅरियर तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती रोजच्या रोज घोषित करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शहरात सव्वा महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६००वर गेली आहे. वाढती रुग्णसंंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे गरजेचे आहे. रुग्णसंख्येचा विचार करता एका रुग्णामागे दोन-तीन हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहेत. एखाद्या रुग्णाने स्वॅब दिल्यानंतर त्याचा प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल यायला चार ते पाच दिवस लागतात, याकाळात रुग्ण होम क्वॉरण्टाइन केलेले असूनदेखील त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे हायरिस्क कॉन्टॅक्ट वाढतात. अनेक लोक भीतीपोटी रुग्णांशी संपर्क होऊन तपासणी करून घेण्यास पुढे येत नाही. त्यात मालेगाव हे अतिघनतेचे शहर असल्याने सर्वसाधारणपणे बाधित रुग्णाच्या व त्याच्या परिवाराच्या संपर्कात दहापेक्षा जास्त लोक येतात.
समितीचे निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, कुंदन चव्हाण, अतुल लोढा, दादा बहिरम, कपिल डांगचे, प्रवीण चौधरी, यशवंत खैरनार, दीपक पाटील आदी सदस्यांनी निवेदनाद्वारे या मागण्या केल्या आहेत.
-----------------------------------
रोज माहिती घोषित करा!
४मालेगाव येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे व सायलेंट कॅरियर तसेच आपत्कालीन सेवा देणाºया व्यक्ती यांच्या टेस्ट करून घेण्यात याव्यात व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती रोजच्या रोज घोषित करण्यात यावी. ट्रेसिंग तपासल्याची माहिती नियमित प्रसिद्ध होणाºया अहवालात एक वेगळा स्तंभ करून दद्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Increase High Risk Contact Tracing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक