हुक्का पार्टीतील ह्यत्याह्ण दोन महिलांच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 10:31 PM2022-03-16T22:31:56+5:302022-03-16T22:32:15+5:30
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये गेल्या शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकून ५२ पुरुषांसह देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या दोघा महिलांना अटक केली होती. या महिलांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना बुधवारी (दि.१६) पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत १९ मार्चपर्यंत वाढ केली. दरम्यान, देहविक्रीसाठी आणलेल्या १८ तरुणींची पुन्हा एकदा २४ मार्चपर्यंत वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टी उधळून लावत हॉटेल मालक, पार्टी आयोजक यांच्यासह ५२ जणांना ताब्यात घेतले होते. या ५२ जणांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, तर देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या दोघींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघींना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर १८ तरुणींची रवानगी २४ मार्चपर्यंत वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये करण्यात आली आहे. त्यांचे मेडिकल व प्रोटेक्शन रिपोर्ट न आल्यामुळे त्यांचा वात्सल्य होममध्ये मुक्काम वाढला आहे. दरम्यान, सरकार वकील अर्चना महाले यांनी युक्तिवाद केला.