देवळा तालुक्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 03:18 PM2020-07-09T15:18:27+5:302020-07-09T15:18:59+5:30

लोहोणेर : - कसमादे सह संपुर्ण महाराष्ट्रात मक्या वर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण कसमादे सह देवळा तालुक्यात गिरणा काठावरील विठेवाडी, भऊर परिसरात महिन्यापुर्वी पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे.

Increase in the incidence of military larvae in Deola taluka | देवळा तालुक्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावात वाढ

देवळा तालुक्यात लष्करी अळीच्या प्रादुर्भावात वाढ

googlenewsNext

लोहोणेर : - कसमादे सह संपुर्ण महाराष्ट्रात मक्या वर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण कसमादे सह देवळा तालुक्यात गिरणा काठावरील विठेवाडी, भऊर परिसरात महिन्यापुर्वी पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे. सुरूवातीला कमी प्रमाणात असलेली लष्करी अळी सर्वच ठिकाणी दिसुन येत असल्यानं, शेतकरी वर्ग धास्तावले आहे. कोळपणी नंतरच्या मशागतीची कामे करत असतांना सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अळी मक्याचे पीक ऐन वाढीवर असतांना झाडाच्या पोग्यात शिरकाव करून संपुर्ण झाडच निकामी होत आहे. त्यामुळे पुढे फुल व कणीस धारणा होताना मोठ्या प्रमाणात बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकंर्यानी पहील्या पंधरवाड्यात एक फवारणी केली आहे. आता ३० ते ३५ दिवसानंतर दुसरी महागडी औषधें फवारणी करावीच लागेल. त्या शिवाय लष्करी अळीचा प्रार्दुभाव आटोक्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Increase in the incidence of military larvae in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक