देवळा तालुक्यात संसर्गात वाढ ; दहीवड येथे जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 09:26 PM2021-03-18T21:26:31+5:302021-03-19T01:14:03+5:30

देवळा : तालुक्यात वेगाने फैलावत चाललेल्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस व महसूल विभाग सतर्क झाला असून नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यात ४७४५ जणांना कोविड लसीकरण करण्यात आले असून यात ६० वर्षांपुढील २३८४ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, दहिवड येथे स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.

Increase in infection in Deola taluka; Public curfew at Dahiwad | देवळा तालुक्यात संसर्गात वाढ ; दहीवड येथे जनता कर्फ्यू

दहीवड येथे नागरिकांनी तीन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पुकारल्यामुळे गावात शुकशुकाट दिसत होता.

googlenewsNext
ठळक मुद्देदेवळा तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट

देवळा : तालुक्यात वेगाने फैलावत चाललेल्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस व महसूल विभाग सतर्क झाला असून नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यात ४७४५ जणांना कोविड लसीकरण करण्यात आले असून यात ६० वर्षांपुढील २३८४ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, दहिवड येथे स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.

देवळा तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून गतवर्षाच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दहीवड येथे कोरोनाची समूह संसर्गाकडे सुरू असलेली वाटचाल रोखण्यासाठी गावात तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. देवळा शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनता कर्फ्यू लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तालुक्यात खामखेडा, खर्डा, दहीवड, लोहाणेर, मेशी येथील आरोग्य केंद्र तसेच देवळा व उमराणे ग्रामीण रुग्णालयात संशयित रुग्णांना अँटीजेन तसेच आर्टीफिशियल टेस्टची तसेच कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देवळा तालुक्यात २४३ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्कचा वापर, स्वच्छता व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे, संशयित रुग्णांनी वेळेवर उपचार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुभाष मांडग यांनी केले आहे.
इन्फो...

कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण हे कोविड सेंटरवर उपचार घेण्यास नकार देऊन घरी राहण्यास पसंती देत आहेत. परंतु, घरात १४ दिवस क्वॉरन्टाईन न राहता तीन -चार दिवसांत बरे वाटू लागल्यानंतर बेफिकीरपणे घराबाहेर पडून गर्दीत फिरताना दिसतात. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. गुरूवारपासून कोरोना रुग्णांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारून त्यांना कटाक्षाने १४ दिवस घरी थांबण्याची सूचना देण्यात येत आहे. सूचनेचे पालन न करणाऱ्या रुग्णांवर स्थानिक प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

देवळा शहरातील काही दुकानदार नगरपंचायतीने दिलेल्या सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करण्याच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. शहरातील सर्व दुकानदारांची अँटीजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह टेस्ट आलेल्या दुकानदारांची दुकाने बंद करून कोरोना संसर्ग रोखावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात देवळा शहरासह ग्रामीण भागात धुमधडाक्यात संपन्न झालेले लग्नसोहळ्यात नियमांचे उल्लंघन करून झालेल्या गर्दीमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

Web Title: Increase in infection in Deola taluka; Public curfew at Dahiwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.