देशहितासाठी राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:54 AM2017-08-22T00:54:28+5:302017-08-22T00:54:44+5:30
स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.
विवेक घळसासी : वसंत गौरव पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
सटाणा : स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले. येथील सहकारमहर्षी वसंतराव दगाजी पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील ट्रस्टतर्फे दरवर्षी विविध संस्थांना व गुणवंत विद्यार्थ्यांना वसंत गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा वसंत गौरव पुरस्कार शहरातील काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्राला जाहीर करण्यात आला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते केंद्राचे संचालक डॉ. सतीश लुंकड यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. त्याप्रसंगी आयोजित व्याख्यानमालेत शहीद भगतसिंग या विषयावर घळसासी बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या रक्तातच राष्ट्रभक्ती, क्रांती आहे. त्यांचे आजोबा क्रांती तत्त्वाचे प्रणेते होते. त्यांनी भगतसिंगांसह दोन्ही नातवांना स्वातंत्र्य लढ्यात उतरविले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी बलिदान देणाºया अशा क्रांतिकारकांचा देशातील आजच्या पिढीला विसर पडत आहे. ही समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचेही परखड मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, हितेंद्र अहेर, प्रल्हाद पाटील, उपनगराध्यक्ष पुष्पा सूर्यवंशी, साहित्यायनचे अध्यक्ष प्रा. शं.क. कापडणीस, कल्याणराव भोसले, श्यामकांत मराठे, समीर पाटील, नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, द्वारकाबाई पाटील, डॉ.विजया पाटील, योगेश पाटील ,अभिजित पाटील, मनीषा पाटील, लालचंद सोनवणे, विजय वाघ, राजेन्द्र भांगडिया, देवेंद्र जाधव, घनश्याम कापडणीस, वसंत महाले आदी उपस्थित होते.