कोंडवाड्यांची संख्या वाढवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:15 AM2017-09-26T00:15:00+5:302017-09-26T00:15:07+5:30
शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या ही वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच नागरिकांनाही उपद्रवी ठरत आहे. महापालिकेचे दोन कोंडवाडे त्यासाठी अपुरे ठरत आहेत. शहराचा विस्तार पाहता कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, मोकाट जनावरांच्या ठेक्याबाबत दर आठवड्याला होणाºया कार्यवाहीचा अहवालही स्थायीला सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या.
नाशिक : शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या ही वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच नागरिकांनाही उपद्रवी ठरत आहे. महापालिकेचे दोन कोंडवाडे त्यासाठी अपुरे ठरत आहेत. शहराचा विस्तार पाहता कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, मोकाट जनावरांच्या ठेक्याबाबत दर आठवड्याला होणाºया कार्यवाहीचा अहवालही स्थायीला सादर करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करत शनिवार, दि. २३ सप्टेंबरच्या अंकात ‘विनादरवाजांचे कोंडवाडे’ या मथळ्याखाली शहरातील कोंडवाड्यांच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्याचीच गंभीर दखल घेत सोमवारी (दि.२५) झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या सभेत भाजपाचे सदस्य जगदीश पाटील आणि मुकेश शहाणे यांनी प्रशासनाला जाब विचारला. मुकेश शहाणे यांनी सांगितले, सातपूर येथील कोंडवाडा मद्यपींचा अड्डा बनला आहे. ज्या
जनावरांचे मालक आले नाहीत, ती जनावरे कोठे जातात, असा सवाल करत त्याच्या संशयास्पद व्यवहाराबद्दल जाब विचारला तर भाजपाचेच जगदीश पाटील यांनी मोकाट जनावरांचा ठेका हा पशुवैद्यकीय विभागाकडे अपेक्षित असताना तो अतिक्रमण विभागाकडे कसा दिला जातो, असा प्रश्न उपस्थित केला. शहरात केवळ दोनच ठिकाणी कोंडवाडे आहेत. त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे सहा विभागात सहा कोंडवाडे असणे जरुरीचे आहे. गोशाळेत पाठविण्यात येणाºया जनावरांच्या नोंदी ठेवल्या जातात काय, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. मोकाट जनावरे पकडण्याच्या ठेकेदाराकडून होणाºया कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्याला स्थायीच्या सभेत ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.
ठेक्याचे काम पशुवैद्यकीय विभागाचेच!
अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी यावेळी खुलासा करताना सांगितले, १ एप्रिल २०१६ पासून अॅनिमल वेल्फेअर या संस्थेला ठेका देण्यात आला आहे. सातपूर येथे बांधकाम विभागाने कोंडवाडा बांधलेला आहे, तर पंचवटीत जुनाच कोंडवाडा आहे. जुन्या नाशकात पूर्वी कोंडवाडा होता, परंतु त्याठिकाणी विकासकाम साकारण्यात आले आहे. आतापर्यंत ५४२ जनावरे पकडण्यात आली असून, ४५७ जनावरे मालकांनी परत नेली आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार ३५९ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ५७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. वैद्यकीय तपासणी करूनच सदर जनावरे गोशाळेत पाठविली जातात. महापालिकेत आता पशुवैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती झालेली असल्याने त्या विभागाकडेच मोकाट जनावरे पकडण्याची जबाबदारी असली पाहिजे, अशी भूमिकाही बहिरम यांनी स्पष्ट केली.