कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:54 PM2020-06-23T16:54:06+5:302020-06-23T16:54:35+5:30

नगरसूल : येवला तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून, एकीकडे मालेगावसारख्या मोठ्या शहरात रुग्णांचे प्रमाण कमी होते आहे, परंतु येवल्यात रु ग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे.

Increase in the number of corona patients | कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Next
ठळक मुद्देयेवला : उपचारासाठी तालुक्यातच पर्यायी व्यवस्थेची गरज

नगरसूल : येवला तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून, एकीकडे मालेगावसारख्या मोठ्या शहरात रुग्णांचे प्रमाण कमी होते आहे, परंतु येवल्यात रु ग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनाच चिंता वाटू लागली आहे.
येवला पंचायत समितीचे उपसभापती गरूड यांनी आरोग्य विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बाभूळगाव कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेले रूग्ण, नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले, परंतु दोन तीन दिवसांपासून अचानक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. कारण नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात कमीत कमी २० ते २५ रुग्ण उपचार घेऊ शकतात, परंतु अधिक रुग्ण वाढल्यास तालुक्यातच तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे गरूड यांनी म्हटले असून, त्या संदर्भातील निवेदनदेखील तहसीलदार यांना सादर केले आहे.

Web Title: Increase in the number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.