जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर; चिंता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:28 PM2020-05-25T21:28:07+5:302020-05-26T00:10:33+5:30
नाशिक : जिल्ह्यात आज सिन्नर व इगतपुरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर येवल्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात ४८ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून, बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती दडविल्याप्रकरणी एका कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : जिल्ह्यात आज सिन्नर व इगतपुरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर येवल्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात ४८ जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून, बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती दडविल्याप्रकरणी एका कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर : तालुक्यातील दापूर व देशवंडी येथे मुंबई येथून आलेल्या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या गावाला ते मुंबई येथून आले होते. या दोन जणांमुळे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित
रु ग्णसंख्या १४ झाली आहे .
दापूर येथे ४० वर्षीय युवक १७ तारखेला मुंबईतून आला होता. त्याला त्रास झाल्याने शनिवारी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर देशवंडी येथील २० वर्षीय युवती मुंबई येथून कुटुंबासह देशवंडी येथे आली होती. तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्यासह आरोग्य प्रशासनाने दोन्ही गावांना भेट देत दापूर व देशवंडी परिसरातील भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत या भागात १४ दिवस सर्वेक्षण केले जाणार आहे. दापुर व देशवंडी येथील रु गांच्या संपर्कातील कुटुंबातील प्रत्येकी ९ व्यक्तींना सिन्नरच्या ग्रामीण रु ग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. बच्छाव यांनी दिली. तर उर्वरित लो कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. दापूर येथे एक, तर देशवंडी येथे तीन आरोग्य पथक सर्व्हे करणार आहेत.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी व बेलगाव कुºहे येथे सोमवारी (दि.२५) दोन कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर घोटी येथील बाजारपेठ मेडिकल व दवाखाने वगळता आठ दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी घोटी येथे कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आला होता. त्यापाठोपाठ सोमवारी बेलगाव कुºहे येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. विशेष म्हणजे सदर रुग्णावर भायखळा येथील रेल्वेच्या दवाखान्यात हृदयरोगावर डायलिसिस पद्धतीने उपचार सुरू होते. मात्र सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर तेथील उपचारपद्धतीमुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी रुग्ण नाशिकला हलवले. रविवारी सायंकाळी रुग्णास बेलगाव कुºहे येथे आणण्यात आले. १४ मे रोजी रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकारी जी. पी. बांबळे हे आरोग्य पथक घेऊन कोरोनाबाधित रु ग्णाच्या घरी दाखल झाले. सदर बेलगाव येथील कुटुंबाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती लपविली असून, रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने वाडीवºहे पोलीस ठाण्यात रुग्णाच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
येवल्यात एक पॉझिटिव्ह; सात अहवाल प्रलंबित
येवला : तालुक्यातील कानडी येथील २४ वर्षीय तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसºया दिवशी शहरातील एका ७० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन झाली असून, प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सक्रि य झाली आहे. येवल्यातील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कानडी येथील कोरोनाबाधित २४ वर्षीय तरूणाशी संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आले आहेत. या सातही जणांना बाभूळगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकच्या अहवालातून २४ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरूष बाधित असल्याचे सांगितले गेले असले तरी सदर रूग्ण हे नाशकात असून त्यांनी मुखेडचा पत्ता दिल्याने येवल्यात रूग्णसंख्या वाढल्याचे दिसते. मुखेडच्या संबंधित बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही खबरदारी म्हणून गावपातळीवर होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. कानडी येथेही खबरदारीचा उपाय म्हणून गावात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.