कोरोनाबाधितांच्या संख्येत १७४ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:41+5:302021-07-07T04:18:41+5:30
नाशिक : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) एकूण १७४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, सोमवारच्या तुलनेत सुमारे ५० ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) एकूण १७४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, सोमवारच्या तुलनेत सुमारे ५० रुग्ण वाढल्याचे दिसून आले. मात्र ३०४ रुग्ण बरे झाले असून, संख्या नवीन रुग्णांच्या दीडपटीहून अधिक आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मंगळवारी ९ मृत्यूंची नोंद झाली असून, यात शहरातील ५ आणि नाशिक ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. तर मालेगावात एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे ही दिलासादायक बाब ठरली आहे. नाशिक शहर व ग्रामीण भागातील ९ मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा वाढला असून, जिल्ह्यात आतापर्यंत ८,३९४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात प्रलंबित अहवालांच्या संख्येत सोमवारच्या तुलनेत घट झाली असून, ही संख्या पुन्हा हजारांच्या खाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ९५२ अहवाल प्रलंबित असून, लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याचा विश्वास येथील आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.