नायगाव आरोग्य केंद्रात मुलींच्या जन्मदरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 10:29 PM2018-10-04T22:29:01+5:302018-10-04T22:30:01+5:30
नायगाव : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देत मुलींचा घसरता जन्मदर वाढविण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. असे असताना जिल्हा व तालुक्यातील चित्र अजूनही फारसे आशादायी नसले तरी नायगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मात्र मुलींच्या जन्मदरात झालेली वाढ शुभ वर्तमान ठरत आहे.
दत्ता दिघोळे।
नायगाव : ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा देत मुलींचा घसरता जन्मदर वाढविण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. असे असताना जिल्हा व तालुक्यातील चित्र अजूनही फारसे आशादायी नसले तरी नायगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मात्र मुलींच्या जन्मदरात झालेली वाढ शुभ वर्तमान ठरत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील मुलींचा जन्मदर कमालीचा घसरत असल्यामुळे तो राज्याबरोबर संपूर्ण देशात एक चिंतेचा विषय बनला आहे. मुला-मुलीत भेदाभेद वाढलेली ही समस्या निर्माण झाली होती. विविध माध्यमातून समाजात मुलींविषयाचा गैरसमज जनजागृतीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न व विविध योजना राबवून केली जात आहे, असे असले तरी नाशिक जिल्ह्याबरोबर सिन्नर तालुक्यातही मुलींच्या जन्मदरात अजूनही समानता आली नाही. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरहजारी ९१९ तर सिन्नर तालुक्याचा ९८२ असा आहे.
मुलींच्या जन्मदराची चिंता दिवसेंदिवस वाढत असताना सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील २२ गावांतील मुलींचा जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत दर हजारी १०८२ इतका वाढल्यामुळे शुभ वर्तमान मानले जात आहे. प्राथमिक केंद्रातील कार्यक्षेत्रात तीन महिन्यांत २२९ जन्मलेल्या बालकांमध्ये ११० मुलांच्या मागे ११९ मुलींचा जन्म झाला आहे. शासनाने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत विविध उपाय म्हणून सर्वच स्तरावर विविध जनजागृतीच्या माध्यमातून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’, ‘मुलगा मुलगी एक समान, देऊ शिक्षण दोघा छान’ आदी घोषवाक्यांसह शासनाने जनमानसात मुलींचा आदर वाढविण्यात आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आदींसह विविध माध्यमातून केलेली जनजागृतीचा नायगाव खोऱ्यात वाढलेल्या मुलींच्या जन्मदरात झालेल्या वाढीतून प्रभाव दिसत असल्याने हे परिसरासह तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जात आहे.नायगाव परिसरात शासनाच्या वतीने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ आदीसह सर्वच उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असल्याचे चित्र दिसत आहे. शासकीय कर्मचाºयांनी केलेली जनजागृती प्रभावीपणे राबविल्याचाच हा सुखद अनुभव सध्या नजरेस पडत असल्याचे बोलले जात आहे.नायगाव येथील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मुलींचा वाढत असलेला जन्मदर समानतेच्या दिशेने पडत असलेले पाऊल कौतुकास्पद आहे. आधुनिक युगात मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे.
- योगीता ठाकरे,
वैद्यकीय अधिकारी, नायगाव.