सटाणा अनलॉक झाल्याने रुण संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:36 PM2020-07-04T15:36:16+5:302020-07-04T15:51:57+5:30

सटाणा:शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

An increase in the number of loans due to the unlocking of Satana | सटाणा अनलॉक झाल्याने रुण संख्येत वाढ

सटाणा अनलॉक झाल्याने रुण संख्येत वाढ

Next
ठळक मुद्देशनिवारी पुन्हा सापडले तीन कोरोना बाधित

सटाणा:शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन शनिवारी (दि.४) पुन्हा दोन महिलांसह तिघे कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आले आहे. शहरात सर्वच नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत असतांना रु ग्ण संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या धर्तीवर बाजारपेठेत सम-विषम नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.असे असतांना सरार्सपणे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे .त्यामुळे पाच दिवसातच शहरातील बाधितांची संख्या दहावर गेली आहे. शनिवारी (दि. ४) दुपारी आलेल्या वैद्यकीय अहवालात शहरातील मध्यवस्तीतील काळूनानाजी नगरमध्ये एका ४५ वर्षीय महिला व ५२ वर्षीय पुरु ष असे दाम्पत्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर मटण मार्केट समोर एक ६० वर्षीय महिला देखील कोरोना बाधित आढळली आहे. गेल्या पाच दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे नविन उपाययोजना केल्या जात नाही. शहरात रु ग्ण संख्या वाढून देखील स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे प्रतिबंधित क्षेत्र देखील लागू केले जात नसल्याने शहरात बाधितांची संख्या वाढण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

Web Title: An increase in the number of loans due to the unlocking of Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.