त्र्यंबकला बाधितांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:08 PM2020-07-16T22:08:36+5:302020-07-17T00:08:42+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील बोंबीलटेक वाडीवर कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथून एक महिला बोंबीलटेक येथे भावाकडे आली होती. सदर महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर महिलेची चाचणी केल्यानंतर तीही पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

ही महिला अंबोली येथे बोंबीलटेक वाडी वस्तीवर चुलत भावाकडे आली होती, अशी माहिती अंबोली येथील पोलीसपाटील ज्ञानेश्वर मेढे, सरपंच चंद्रभागा लचके यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवल्यानंतर आरोग्यसेवक डॉ. घोरसडे, डॉ. भोई व पथकाने प्राथमिक चौकशी केली.
सदर महिलेला कोविड सेंटरला हलवण्यात आल्यानंतर संपर्कात आलेल्या दहा लोकांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक पाठवण्यात आलेले होते. यापैकी आठ जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहे, असे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
तहसीलदार दीपक गिरासे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ, योगेश मोरे, अरुण मेढे, संजय मेढे, उपसरपंच लंकाबाई मेढे, डॉ. भोई, डॉ. घोरसडे, आरोग्यसेवक मोकाळ, दीपक मिंदे, पांडुरंग लचके, भोरू पारधी यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.