दिंडोरीत बाधितांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:17 PM2020-06-29T22:17:48+5:302020-06-29T22:20:01+5:30
दिंडोरी : तालुक्यात सोमवारी अवनखेड (सध्या नाशिक रहिवासी) व परमोरी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकी तीन अशा एकूण सहा रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ५ रूग्ण सापडल्याने दोन दिवसात नवीन ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अवनखेड येथील नाशिक येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या नाशिक, अवनखेड, वलखेड, दिंडोरी, ढकांबे येथील काही व्यक्तींना विलगीकरण कक्षात नेत त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी अवनखेड, वलखेड येथील सर्व व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले; परंतु रुग्णाचे कुटुंबातील नाशिक येथे रहिवाशी एक, ढकांबे व दिंडोरी टेलिफोन कॉलनी येथील त्यांचे कार्यालयातील कर्मचारी प्रत्येकी एक असे तीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. परमोरी येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तीन जणांचे रिपोर्ट पोझिटिव्ह आले आहेत.कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. मास्क किंवा रूमाल, सॅनिटायझर वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी सरकारने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे.