उमराणे बाजार समितीत कांद्याच्या आवकेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:51+5:302021-06-09T04:16:51+5:30

उमराणे : पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खते व इतर वस्तूंच्या खर्चासाठी लागणारा पैसा उपलब्ध होण्यासाठी ...

Increase in onion import in Umrane market committee | उमराणे बाजार समितीत कांद्याच्या आवकेत वाढ

उमराणे बाजार समितीत कांद्याच्या आवकेत वाढ

Next

उमराणे : पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खते व इतर वस्तूंच्या खर्चासाठी लागणारा पैसा उपलब्ध होण्यासाठी सद्यस्थितीत शेतकऱ्यांजवळ उन्हाळी कांदा विक्रीचा एकमेव पर्याय असल्याने कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. त्यामुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक वाढली आहे. वाढलेल्या आवकेमुळे बाजारभावात गतसप्ताहाच्या तुलनेत दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. यापूर्वी खरीप हंगामासाठी जिल्हा बँक, विकास सोसायटी आदींकडून शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात कर्जवाटप केले जात होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण दिसून येत आहे. परिणामी आगामी काळात बाजारभाव वाढतील, या अपेक्षेपोटी चाळीत साठवणूक केलेला कांदा खरीप हंगामातील पिके पेरणीसाठी बी-बियाणे, खते, रासायनिक खते आदी वस्तू विकत घेता यावीत, यासाठी सद्यस्थितीत मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने येथील बाजार समितीत गेल्या महिनाभराच्या तुलनेत सोमवार (दि. ७) रोजी कांद्याची प्रचंड आवक झाली आहे.

------------------------

आवक वाढल्याने मागील आठवड्यातील शुक्रवारी निघालेल्या बाजारभावाच्या तुलनेत दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली असून बाजारभाव कमीत कमी ९०० रुपये, जास्तीत जास्त २०५० रुपये तर सरासरी १५०० रुपये दराने कांदा विक्री झाला. बाजार आवारात पंधराशे ते सतराशे ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून सुमारे तीस हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज बाजार समितीकडून वर्तविण्यात आला आहे.

---------------

यापूर्वी जिल्हा बँक व विकास सोसायटी यांच्या माध्यमातून कर्ज मिळत होते. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे कर्ज मिळत नसल्याने खरीप हंगामाच्या खर्चासाठी चाळीत साठवणूक केलेला कांदा मिळेल त्या भावात विक्री करावा लागत आहे.

- सुनील देवरे, कांदा विक्रेता शेतकरी

-----------------------

उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याची झालेली प्रचंड आवक. (०७ उमराणे)

===Photopath===

070621\07nsk_23_07062021_13.jpg

===Caption===

०७ उमराणे

Web Title: Increase in onion import in Umrane market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.