अभोणा बाजारात कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:43 IST2020-09-03T00:07:14+5:302020-09-03T01:43:26+5:30
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात बुधवारी (दि.२) ४०७ ट्रॅक्टर्सद्वारे १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

अभोणा बाजारात कांदा दरात वाढ
ठळक मुद्देसरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात बुधवारी (दि.२) ४०७ ट्रॅक्टर्सद्वारे १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल २१४० रु पये, किमान ४० रु पये तर सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत होती.