लाल कांद्याच्या आवकेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:40 PM2019-12-23T12:40:26+5:302019-12-23T12:40:33+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळी लाल कांद्याची १२,२०४ क्विंटल कांद्याची आवक झाली.
लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळी लाल कांद्याची १२,२०४ क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान १५००, जास्तीत जास्त ८१०० तर सरासरी ६६०० रूपये भाव मिळाला. वणी येथील उपबाजार आवारात लाल कांद्यातील दरामुळे उत्पादकांच्या चेहऱ्यावर लाली पसरली असुन उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी सद्यस्थितीत मिळणाºया दरामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शुक्र वार व शनिवार अशा दोन दिवसात २५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. शुक्र वारी १८५ वाहनामधुन १४०० क्विंटल आवक झाली. ७५०१ कमाल, ४००० किमान तर ५२५० सरासरी प्रती क्विंटलचा दर मिळाला. तर शनिवारी ११०० क्विंटल आवक १६४ वाहनामधुन उपबाजारात झाली. ७६७६ कमाल, ३७५१ किमान तर ५५७५ सरासरी प्रति क्विंटल अशा भावाने कांदा खरेदी विक्र ी व्यवहार पार पाडण्यात आले. शुक्र वारपेक्षा शनिवारी दरात काहीशी सुधारणा झाली.