प्रतिबंधात्मक कारवाई वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:19+5:302021-04-04T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याच्या सूचना उपविभागीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड ेव निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, आरोग्य, महसूल अशा सर्वच विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मुसळगावचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, वावीचे सहायक निरीक्षक सागर कोते आदी उपस्थित होते.
परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच कारवाईचा बडगा उगारणे अपरिहार्य असल्याचे उपविभागीय अधिकारी गायकवाड यांनी सांगितले. कोरोना रूग्णांच्या संपर्कातील कुटुंबीय, नागरिक यांचे जास्तीत जास्त ट्रेसिंग करून कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या. सध्या हे प्रमाण शहर व ग्रामीण भागात पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात सुरू असून, प्रतिबंधित क्षेत्रांवरही लक्ष केंद्रीत केले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलेे.
-------------------------
समन्वयाची आवश्यकता
कोरोनाविरुद्धची लढाई लढताना सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वयाची आवश्यकता असून, असे झाले तरच संसर्ग रोखण्यात यश येईल, असे तहसीलदार कोताडे म्हणाले. पोलीस यंत्रणेने आपापल्या कार्यक्षेत्रात व्यावसायिक तसेच नागरिकांना कोरोना नियमांचे तसेच अंशत: लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळण्यास भाग पाडावे, तसे होत नसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात अजिबात कुचराई करू नये, अशी सक्त ताकीद पोलीस उपअधीक्षक तांबे यांनी पोलिसांना दिली. ग्रामीण रूग्णालय, इंडिया बुल्स कोविड सेंटरमध्ये रूग्णांवर उपचार सुरू आहेत. खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात, शिवाजीनगर व नगर परिषद दवाखान्यात लसीकरण वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
-------------------
सिन्नर येथे कोरोना आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (०३ सिन्नर १)
===Photopath===
030421\03nsk_13_03042021_13.jpg
===Caption===
०३ सिन्नर १