लाल कांदा आवकेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:25 PM2021-03-20T21:25:14+5:302021-03-21T00:46:01+5:30

येवला : सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर लाल कांदा आवकेत वाढ झाली. मागणी कमी झाल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसुन आले.

Increase in red onion import | लाल कांदा आवकेत वाढ

लाल कांदा आवकेत वाढ

Next
ठळक मुद्देयेवला : बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण

येवला : सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर लाल कांदा आवकेत वाढ झाली. मागणी कमी झाल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसुन आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ८२२३६ क्विंटल झाली असुन लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १४४१ रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ३८४६० क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १४७६ तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.
सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक १२८२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १५५० ते कमाल १८८१ तर सरासरी १७१५ रुपयांपर्यंत होते.

सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती. तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. बाजरीस स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक ३५४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १२२५ ते कमाल १७०० तर सरासरी १२७० रुपयांपर्यंत होते.
सप्ताहात हरभ-याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. हरब-यास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात हरभ-याची एकुण आवक २११ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३६५० ते कमाल ५०३० तर सरासरी ४८५० रुपयांपर्यंत होते.

तुरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात तुरीची एकुण आवक ६० क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ५००० ते कमाल ६५०० तर सरासरी ६२०० पर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयाबीनची एकुण आवक १३० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ४२०० ते कमाल ५८०० तर सरासरी ५३०० रुपयांपर्यंत होते.

मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात मक्याची एकुण आवक १०२३७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३२५ ते कमाल १५१७ तर सरासरी रु. १४६५ प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार उपबाजार अंदरसुल येथे मकाची आवक २३१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १२०० ते १४५५ तर सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होते.

Web Title: Increase in red onion import

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.