निफाडमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:17 PM2020-06-19T22:17:31+5:302020-06-20T00:24:25+5:30
निफाड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे.
निफाड : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे.
तालुक्यात सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घेतली जातात. यावर्षी सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट १८,८४१ हेक्टर, मक्याचे १४,२१५ हे., बाजरीचे ४५७, भुईमूग ९५०, तुरीचे ४७०, मुगाचे ४६६, उडीद ६१६, तर कापसाचे ८० हेक्टर प्रस्तावित आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका यांची पातळी बºयापैकी टिकून आहे. तालुक्याचे जे खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हे. आहे, त्यापेक्षा जास्त ३५,४७५ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी जुलैअखेर तालुक्यात १४३ टक्के खरिपाची पेरणी झाली होती, मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा सोयाबीन व मक्याच्या उत्पादनावर परिणाम झाला होता.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा, मका व इतर पिके काढलेली आहेत. त्यामुळे शेतात नांगरणी, रोटरी, फळी मारून शेतीची मशागत करून ठेवलेली आहे. सध्या सोयाबीन पेरणीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची बियाणे विकत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणाला मागणी वाढली आहे. रसवंत्या बंद असल्याने उन्हाळ्यात उसाला अत्यंत कमी म्हणजे १,००० ते १३०० रुपये दर मिळाल्याने ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत.
बी-बियाणांच्या दुकानांसमोर बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. काही शेतकरी घरगुती सोयाबीनचे बियाणे विकत घेत आहेत. यावर्षी कोरोनामुळे भाजीपाल्यासह फळपिकांना दर न मिळाल्याने शेतकºयांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल वाढू शकतो. शेतकºयांनी ऊस लागवडीस प्रारंभ केला आहे. बाजरी, भुईमूग, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरण्याची तयारी केली आहे. मात्र तालुक्यात बाजरी, भुईमूग, मूग, उडीद आदी पिके कमी प्रमाणात घेतली जातात. यावर्षी उसाला लॉकडाऊनमुळे दर मिळाला नाही.
यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. यावर्षी सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तणनाशक पाण्यात मिसळून पाठीवरच्या पंपाच्या साहाय्याने मका पीक पेरणीनंतर लगेच जमिनीवर फवारावे. सध्या शेतकºयांकडे घरचे सोयाबीनची बियाणे उपलब्ध असेल तर ती पेरावी, पेरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी, रासायनिक खताबाबत काही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकाºयाशी संपर्क साधावा.
- बटू पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड