जिल्ह्यातील निम्म्या धरणांतील साठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:50 AM2019-07-20T01:50:31+5:302019-07-20T01:51:45+5:30
जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
नाशिक : जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचे
संकट ओढवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि येवला या तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २५० मि.मी. म्हणजे ५७.६७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्याखालोखाल नाशिक (६५.४० टक्के), इगतपुरी (४५.४७ टक्के), दिंडोरी (३४.३४ टक्के), पेठ (४१.५५ टक्के), त्र्यंबकेश्वर (४४.५३ टक्के), सुरगाणा (३१.०७ टक्के), निफाड (५७.६७ टक्के) याप्रमाणे पाऊस पडलेला आहे. तर मालेगाव (२७ टक्के), नांदगाव (११.५६ टक्के), चांदवड (१३.७० टक्के), कळवण (७.२३ टक्के), बागलाण (२५.७६ टक्के), देवळा (९.०२ टक्के), निफाड (२९.६२ टक्के) या तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झालेली असून, मागील वर्षी याच कालावधीत ४७ टक्के पाऊस झालेला होता. जिल्ह्यात कळवण आणि देवळा तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. तेथे पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मात्र, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र बनत चालली आहे.
नांदूरमधमेश्वरमध्ये सर्वाधिक साठा
जिल्ह्यातील निम्म्या धरणांतील पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झालेली आहे. त्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्प ९८ टक्के भरले आहे. त्याखालोखाल भावली (८० टक्के), दारणा (७१ टक्के), वालदेवी (५७ टक्के), गंगापूर (५४ टक्के), कडवा (५२ टक्के), गौतमी गोदावरी (३७ टक्के), काश्यपी (३५ टक्के), आळंदी (३० टक्के), मुकणे (२३ टक्के) याप्रमाणे पाणीसाठा वाढला आहे. पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, माणिकपुंज हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक पडलेले आहेत.