भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील गोडवा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:15+5:302021-08-26T04:17:15+5:30
ओझर टाऊनशिप : आपल्या भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, या नात्यातील दुरावा वाढत ...
ओझर टाऊनशिप : आपल्या भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, या नात्यातील दुरावा वाढत चालल्याचे अनेकदा पाहायला मिळते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक भावाने बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करावा. बहिणीच्या अडचणीच्या काळात धावून जावे आणि बहिणीनेही हिस्सा मागून आपल्या भावाच्या संसारात अडचण निर्माण करू नये, असे सांगतानाच बहीण- भावाच्या पवित्र नात्यातील गोडवा टिकून ठेवणे गरजेचे असल्याचे स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केले. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे आयोजित रक्षाबंधनाच्या सोहळ्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आश्रमाच्या वतीने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
तरुणांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार करावा. घरातील लहान मुलांना रोज मंदिरात, बालसंस्कार केंद्रात नेऊन त्यांना संस्कारित करावे. स्त्रियांनी आपल्या पतीला देव मानून सेवा करावी. पुरुषांनी एकपत्नी व्रताचे पालन करावे आणि परमपूज्य बाबाजींनी सांगितलेल्या परधन, परनिंदा, परान्न, परस्त्री या चतु:सूत्रीचे पालन करावे, असेही शांतीगिरी महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले.