पिंपळगाव शहरात तीन रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:59 PM2020-07-17T20:59:15+5:302020-07-18T00:43:12+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोळीवाडा परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीसह गुरु वारी प्राप्त अहवालात शहरातील उंबरखेड रोडवरील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

नोकरीसाठी कल्याण येथे स्थायिक झालेल्या पिंपळगाव बसवंत शहरातील कोळीवाडा परिसरातील व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे जाणवत असल्याने त्याने कल्याण येथे घशाचे स्वॅब देऊन पिंपळगावी कुटुंबातील सदस्यांसह घरी आला. घरी आल्यानंतर मंगळवारी रात्री सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिल्याने परिसरात भीती व्यक्त होत आहे. त्यास पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेडरोड येथील महिला काही दिवसांपूर्वी बाहेरून प्रवास करून आल्याने तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हायरिस्क रु ग्णाच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील ५२ वर्षीय व्यक्तीसह १७ वर्षाच्या मुलीचा अहवाल गुरु वारी पॉझिटिव्ह आले असून कुटुंबातील सदस्यांना क्वारण्टाईन करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.