कॉलेजरोडला वाहतूक समस्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:21 AM2018-02-22T01:21:14+5:302018-02-22T01:21:57+5:30

: गंगापूररोडवर बेशिस्त पार्किंग व अनधिकृत थांबे या समस्येने डोके वर काढले असून, त्यामुळे येथील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असतानादेखील ते नावापुरतेच ठरले असून, पादचाºयांना चालणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी पश्चिम प्रभागात लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

Increase in traffic problem for the college | कॉलेजरोडला वाहतूक समस्येत वाढ

कॉलेजरोडला वाहतूक समस्येत वाढ

Next

गंगापूररोड : गंगापूररोडवर बेशिस्त पार्किंग व अनधिकृत थांबे या समस्येने डोके वर काढले असून, त्यामुळे येथील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असतानादेखील ते नावापुरतेच ठरले असून, पादचाºयांना चालणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी पश्चिम प्रभागात लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे. पश्चिम नाशिकमधील कॉलेजरोड, गंगापूररोड आणि त्र्यंबकरोड या सर्वच महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. गंगापूररोड व कॉलेजरोडला जोडणाºया शहीद चौक, प्रसाद सर्कल, विद्याविकास सर्कल आदी चौकांमध्ये अनेकवेळा वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात या चौकांमध्ये एन वळणावर सर्रास वाहने पार्ककेली जात असून, गर्दीच्या वेळी या समस्येत आणखी भर पडते आहे. एकीकडे रहदारीची ही समस्या कायम असतानाच दुसरीकडे मात्र पादचाºयांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  डोंगरे वसतिगृह सिग्नल, जेहान सिग्नल व पाइपलाइनरोडचा सिग्नल या तिन्ही ठिकाणी रेड सिग्नलवेळी वाहनचालक थेट झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करत असल्याने पादचाºयांना विशेषत: वयोवृद्ध नागरिक व विद्यºर्यांना रस्ता ओलांडताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीत तर अनेक वाहनचालक झेब्रा क्र ॉसिंगच्याही पुढे जाऊन सिग्नल न पाळता पळून जाण्याची संधी साधत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत असून, या प्रकारामुळे रस्ता ओलांडणाºया पादचाºयांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनी वेळीच याप्रश्नी लक्ष घालून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Web Title: Increase in traffic problem for the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.