पांडवनगरीत विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याच्या प्रकारात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:51 PM2018-05-28T17:51:10+5:302018-05-28T17:51:10+5:30
इंदिरानगर/नाशिक - पांडवनगरी परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटार लावण्याची स्पर्धा दिसत असून त्यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. संबंधितांवर कडक कारवई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
पांडवनगरी येथे विशेष सरकारी योजनेतून घरे बांधण्यात आली आहेत. सुमारे अडीच हजार सदनिका असून त्यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तीन मजली अपार्टमेंट असल्याने दुसऱ्या व तिसºया मजल्यांवर पाणी चढत नाही. त्यामुळे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याची जणु काही स्पर्धा सुरू आहे. परिसरात निर्माण होणाºया कृत्रिम पाणीटंचाईची दखल घेत स्वतंत्र नवीन जलकुंभ बांधण्यात आला. तसेच महिन्यापासून नवीन जलकुंभातून पांडवनगरी परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे तिसºया मजल्यांपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा काही नागरिक अद्यापही सर्रासपणे जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्याने परिसरातील नागरिकांना कृतीम पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तातडीने पाणीपुरवठा विभागाने विद्युत मोटारी जप्त करुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.