सिडकोत लसीकरण केंद्रे वाढवा; राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:32+5:302021-05-09T04:14:32+5:30
सिडको : चार लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिडको भागात केवळ तीन ते चार ठिकाणी महापालिकेतर्फे लसीकरण केंद्र सुरू ...
सिडको : चार लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिडको भागात केवळ तीन ते चार ठिकाणी महापालिकेतर्फे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, सिडकोच्या लोकसंख्येच्या तुलनेने लसीकरण केंद्र अधिक असणे गरजेचे असून, यामुळे गर्दीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करून नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या संदर्भात सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सिडकोत लोकसंख्येच्या तुलनेत केवळ तीन ते चार लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. या सर्वच लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागते. लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्याने पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, लसीकरणाचे ॲपमध्ये सुधारणा करून सिडको भागात जास्तीत जास्त ठिकाणी मनपाने लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन सिडको राष्ट्रवादीचे अध्यक्ष मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, अजय पाटील, अक्षय परदेशी, आदींनी दिले.
(फोटो ०८ सिडको) - सिडकोत जास्तीत जास्त ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निवेदन मयूर पाटील यांना मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, अजय पाटील, अक्षय परदेशी यांनी दिले.