भाम, कडवा धरणात पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:47+5:302021-08-01T04:14:47+5:30
इगतपुरी तालुक्यात सहा मोठे प्रकल्प हे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असून वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. दारणा धरणात जलसंपदा ...
इगतपुरी तालुक्यात सहा मोठे प्रकल्प हे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असून वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. दारणा धरणात जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार ७८ टक्के जलसाठा स्थिर ठेवून उर्वरित पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर भावली हे धरणही ओव्हरफ्लो झाल्याने आता याही धरणातून दारणापात्रात विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील भाम धरणात आजस्थितीत झपाट्याने वाढ झाली आहे. हे धरण ७७.७५ टक्के भरले आहे तर कडवा धरणात ६० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर मुकणे धरणातही ४८.२९ टक्के तर वाकी धरणात अवघा ३९.७७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. अप्पर वैतरणा धरणात ६८ टक्के साठा उपलब्ध झाला आहे.
दारणा धरणातून ५५४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून भावली धरणातूनही २९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अद्यापही पावसाच्या सरी कोसळत आहेत.
---------------------------
इन्फो
धरणांचा आजचा उपलब्ध साठा
दारणा - ७७.७५ टक्के
भावली - १०० टक्के
भाम - ७२.७१ टक्के
कडवा - ६० टक्के
मुकणे - ४८.२९
वाकी - ३९.७७
अप्पर वैतरणा - ६८ टक्के