चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:46 PM2019-08-04T21:46:55+5:302019-08-04T21:52:09+5:30

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.

An increase in the water level in the Chanakpur-Arjunasagar (Punand) project | चणकापूर-अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ

चणकापूर डॅम

googlenewsNext
ठळक मुद्देकळवण : हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग; गावांचा संपर्क तुटला; नद्यांना आला पूर

कळवण : तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहेत.
तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने पाळे खुर्द, एकलहरे, हिंगळवाडी, भादवन, बिजोरे, परिसरातील गावांचा संपर्क तुटला असून पर्यायी व्यवस्था असल्याने पर्यायी मार्गाने ग्रामस्थांनी मार्ग काढला. चणकापूरमधून रात्री ७६३० तर रविवारी दुपारी १७१९१ व चार वाजता १५५९३ क्यूसेसने पाणी विसर्ग होत असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रशासनाने नदीकाढावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शुक्र वार व शनिवारच्या पावसाच्या सततधार मुळे १६१४ दशलक्ष घनफूट साठा (६६ टक्के) चणकापूर धरणात उपलब्ध झाल्याने रात्री १२ धरणाच्या चार वक्र ाद्वारातून ४३६० क्यूसेस इतक्या प्रवाहाने गिरणा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी धरणाच्या सात वक्र ाद्वारे दोन फुटाने उघडून त्याद्वारे ७६३० क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आले असून पावसाची सततधार अशीच चालू राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असून बेहडा व इतर नदी नाले व पुनंद धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीपात्र १२००० ते १५००० क्यूसेस प्रवाहाने वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पूरपाणी सोडण्यात आल्याने, गोसराने, अभोणा, पाळे बु., पाळे खु., बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दि., काठरे दि., सुळे, पिंपळे खु., पिंपळे बु., देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना पूरपाण्याचा फटका बसला बसण्याची शक्यता असून शेती व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील तांबडी, बेहडी नदीला पूर आला असून, तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदींसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरल्याने पूरपाणी नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्याना पूर आल्याने शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनीबेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरली आहेत. येत्या २ ते ३ दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्युसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली येणार आहे. कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लपा प्रकल्प १०० टक्के भरली जाणार असल्याने भविष्यातील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे फुल भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ होणार आहे.

Web Title: An increase in the water level in the Chanakpur-Arjunasagar (Punand) project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण