नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 04:19 PM2017-07-22T16:19:21+5:302017-07-22T16:27:42+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 22 - नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि ...

Increase in water level of Godavari river in Nashik, alert alert | नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा

नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा

Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला. शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारमुळे जवळपास सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यास शनिवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे.
 
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना,  तसेच वर्षा सहलीसाठी येणा-या पर्यटकांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सुरक्षिततेला महत्त्व द्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  
 
शनिवारी सकाळी 10 वाजता गंगापूर धरणातून 2496 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीच्या अहिल्यादेवी होळकर पुलाखालून 4 हजार क्युसेक पाणी पुढे गोदापत्रात प्रवाहीत आहे. दारणा धरणातून 13980 क्युसेक कडवा धरणातून 6834 क्युसेक तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 30945 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
आणखी बातम्या वाचा
(गंगापूर, दारणामधून विसर्ग वाढला)
(इगतपुरीतील भावली धरण फुल्ल)
(फळभाज्या दरात घसरण; आवक वाढली)
 
https://www.dailymotion.com/video/x8458vg

Web Title: Increase in water level of Godavari river in Nashik, alert alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.