दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:27 PM2020-08-13T17:27:53+5:302020-08-13T17:29:07+5:30

नांदुरवैद्य : इगतपुरीच्या पुर्व भागात असलेल्या नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख ...

Increase in water storage of Darna, Mukne dam | दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ

दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देदारणा धरणातून ७४०८ क्युसेसचा विसर्गइगतपुरीत संततधार ९०.०८ टक्के विक्र मी पावसाची नोंद भात पिकांसाठी पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

नांदुरवैद्य : इगतपुरीच्या पुर्व भागात असलेल्या नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडीभरुन वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या संततधारेमुळे ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून गुरूवारी (दि.१३) ७४०८ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. दिवसभरात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २३०५ मिमी विक्र मी पाऊस नोंदविला गेला आहे. तर वार्षिक सरासरीच्या ९०.०८ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ७८१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असुन पाऊस असाच सुरु राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ करण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दहा आठवठ्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात पाणी साचून नदी-नाले दुथडी भरु न वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर दारणा धरणा बरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रतिक्रि या...
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरण भरले असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेला पाऊस असाच पडत राहिला तर अतिरिक्त फुगवट्याचे पाण्यामुळे सरासरीच्या तुलनेत धरण भरायला वेळ लागणार नाही.
- सुरेश जाचक, शाखा अभियंता दारणा धरण.
(फोटो १३ नांदूरवैद्य)
इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सततधारेने दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग करण्यात आला.

Web Title: Increase in water storage of Darna, Mukne dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.