दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:45 PM2020-08-14T12:45:56+5:302020-08-14T12:48:11+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या संततधारेमुळे ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, गुरुवारी (दि. १३) ७४०८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. दिवसभरात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर २३०५ मिमी विक्र मी पाऊस नोंदविला गेला आहे. वार्षिक सरासरीच्या ९०.०८ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ७८१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, पाऊस असाच सुरू राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दहा आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात पाणी साचून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून, धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
प्रतिक्रि या...
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरण भरले असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेला पाऊस असाच पडत राहिला तर अतिरिक्त फुगवट्याचे पाण्यामुळे सरासरीच्या तुलनेत धरण भरायला वेळ लागणार नाही.
- सुरेश जाचक, शाखा अभियंता दारणा धरण