कामगारांच्या कोरोना विमा लाभात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:20+5:302021-05-20T04:15:20+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा विमा एका लाईफ रिस्क पॉलिसीप्रमाणे असतो. कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुअरन्स योजनेतर्गत हा विमा प्रत्येक पीएफ ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा विमा एका लाईफ रिस्क पॉलिसीप्रमाणे असतो. कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुअरन्स योजनेतर्गत हा विमा प्रत्येक पीएफ सभासदास आपोआप लागू असतो. ज्या सभासदाचा मृत्यू सेवेत असताना झाला तर त्याच्या कुटुंबाला ही विम्याची रक्कम दिली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व सुधारणा अधिनियम १९५२ अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी विमा योजना १९७६ नुसार दि. १५ फेब्रुवारी २० पासून सात लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम कमीतकमी अडीच लाख ते सहा लाख एवढी होती. परंतु राजीनामा दिलेला अथवा कायमस्वरूपी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यास या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
भविष्य निर्वाह निधी विभागातर्फे एकूण २ लाख ५० हजार २७६ सभासदांना एक अब्ज ५ कोटी ५३ लाख रुपये अदा करण्यात आले असल्याचे नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने भविष्य निधी (पीएफ) काढणाऱ्या ४७ हजार ७२२ सभासदांनी ३५ कोटी ४ लाख रुपये काढले. पीएफ खात्यातून उचल (ॲडव्हन्स) घेणाऱ्या एक लाख ३२ हजार ५७५ सभासदांद्वारे ४० कोटी २६ लाख रुपये विविध कारणांमुळे काढण्यात आले. पेन्शन दाव्यासाठी ५ हजार ८९६ सभासदांद्वारे २२ कोटी ९८ लाख रुपये काढले. तर पेन्शन योजनच्या १०-सी साठी ३४ हजार ५०७ सभासदांद्वारे ५ कोटी ६७ लाख रुपये काढले. शासनाच्या लागू केलेल्या मृत्यू विमा योजनेत ४७६ सभासदांच्या वारसांना एक कोटी ६० लाख रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.
इन्फो==
कर्मचारी भविष्य निधी सलग्न विमा योजनेअंतर्गत रक्कम एका लाईफ रिस्क पॉलिसीप्रमाणे असते. भविष्य निधी सभासदास जर दुर्दैवाने कामावर असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या मृत्यूनंतर वारसदारांना विम्याची रक्कम दिली जाते. ही रक्कम कमीत कमी अडीच लाख व जास्तीत जास्त सात लाख रुपयांपर्यंत केली आहे. या योजनेबाबत सभासदास व त्यांच्या कुटुंबास माहिती असणे गरजेचे आहे.
- एम. एम. अशरफ, क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त.