दहा महिन्यांत वाढविले तब्बल २१८ रुपये अन् कमी केले केवळ १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:45+5:302021-04-05T04:13:45+5:30
कोट- गॅस सिलिंडरचे दर केवळ दहा रुपयांनी कमी करून शासनाने सर्वसामान्यांची चेष्टा केली आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने किमती ...
कोट-
गॅस सिलिंडरचे दर केवळ दहा रुपयांनी कमी करून शासनाने सर्वसामान्यांची चेष्टा केली आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने किमती वाढत असल्यामुळे अनेकांचे बजेट ढासळले आहे. केंद्राने गॅसचे दर आणखी कमी करायला हवेत
- सविता काळे, गृहिणी
कोट-
कोरोनामुळे मागील वर्षापासून पगार कमी झाले आहेत ते अद्याप वाढलेले नाहीत. यामुळे सर्व घरखर्च भागविताना खूपच अडचणी येतात. गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत असून यावेळी त्यात केवळ दहा रुपयांनी कमी झाली आहे. याचा अर्थ त्या पुढे वाढणार नाहीत असे नाही. किमान २०० रुपयांनी किमती कमी व्हायला हव्यात. - शेवंता पवार, गृहिणी
कोट-
गॅसच्या दर महिन्याला वाढणाऱ्या किमतीमुळे आता गॅसपेक्षा आपली चूलच बरी वाटू लागली आहे. लाकूडफाट्यावर स्वयंपाक होऊ शकतो. केंद्राने उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस तर दिला, पण दर महिन्याला सिलिंडर घ्यावेच लागते. हातावर पोट असणाऱ्या आमच्यासारख्यांनी एवढे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- चंद्रभागा गाढे, गृहिणी
मागील सहा महिन्यातील गॅसच्या किमती
नोव्हेंबर २०२०- ६०६
डिसेंबर २०२०- ७०६
जानेवारी २०२१- ७०६
फेब्रुवारी २०२१- ७८१
मार्च २०२१ - ८३१
एप्रिल २०२१ - ८१२.५०
चौकट-
दहा महिन्यात २१८ रुपयांनी वाढ
मागील वर्षभरापासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जून २०२० ते एप्रिल २०२१ या दहा महिन्यांत तब्बल २१८ रुपयांनी किमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागात अनेक महिलांनी सिलिंडर न घेता पुन्हा चुली वापरण्यास सुरुवात केली आहे. या महिलांना धुरापासून मुक्ती कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.