वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:50 AM2017-10-25T00:50:13+5:302017-10-25T00:50:18+5:30

वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

Increased amount of illness due to climate change | वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण

वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण

Next

नाशिक : वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.  वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्यामुळे औषध फवारणी, स्वच्छता होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष देऊन आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये, दिवसा उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा, डोक्यावर टोपी परिधान करावी, संध्याकाळीदेखील बाहेर फिरताना काळजी घ्यावी, दुचाकीवरून प्रवास करताना नाका-तोंडाला रुमाल लावावा व कानात कापसाचे बोळे ठेवावे, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
बालकांच्या आरोग्य जपा
बदलत्या हवामान व ऋतुमानामुळे नागरिकांनी बालकांचे आरोग्यही जपण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर बदलत्या हवामानाचा लवकर परिणाम होत असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जर कोणाला सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर त्या व्यक्तीपासून बालकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: Increased amount of illness due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.