नागरिकांच्या मुक्त संचाराने कोरोना प्रादुर्भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:12 AM2021-04-05T04:12:50+5:302021-04-05T04:12:50+5:30

प्रशासकीय पातळीवर व आरोग्य यंत्रणेकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती, संशयित रुग्णांची तपासणी, लसीकरण, आदी विविध उपाययोजना केल्या जात ...

Increased corona prevalence through free movement of citizens | नागरिकांच्या मुक्त संचाराने कोरोना प्रादुर्भावात वाढ

नागरिकांच्या मुक्त संचाराने कोरोना प्रादुर्भावात वाढ

Next

प्रशासकीय पातळीवर व आरोग्य यंत्रणेकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती, संशयित रुग्णांची तपासणी, लसीकरण, आदी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी गावपातळीवर व स्थानिक प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात असली तरी काही गावात होम क्वाॅरंटाईन केलेले रुग्ण बेफिकीरपणे गावात फिरून कोरोनाचा संसर्ग वाढवित आहेत. हे रुग्ण ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानत नसल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्या पुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. वाजगाव येथे आरोग्य विभागाने शेवटी पोलिसांची मदत घेत ह्या होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना घराबाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली.

देवळा तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, गतवर्षाच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देवळा शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. तालुक्यात खामखेडा, खर्डा, दहीवड, लोहाणेर, मेशी येथील आरोग्य केंद्र, तसेच देवळा व उमराणा ग्रामीण रुग्णालयात संशयित रुग्णांना अँटिजेन, तसेच आर्टाफिशियल टेस्टची, तसेच कोविड लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आशा सेविका होम क्वाॅरंटाईन रुग्णांची नियमितपणे तपासणी करून त्यांना योग्य त्या सूचना देतात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मास्कचा वापर, स्वच्छता, व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यांत देवळा शहरासह ग्रामीण भागात धुमधडाक्यात संपन्न झालेले लग्नसोहळे, अंत्यविधी व दशक्रिया विधि कार्यक्रमांना नियमांचे उल्लंघन करून झालेल्या गर्दीमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

जनता कर्फ्यूनंतर नागरिकांमध्ये बऱ्यापैकी कोरोना प्रती जागृती झाल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या धाकाने का होईना नागरिक घराबाहेर पडताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करताना दिसत आहेत.

जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठा बंद असून, रस्ते ओस पडले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक, तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली जात आहे.

इन्फो...

३ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्ण स्थिती

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या-३१०७

नगरपरिषद क्षेत्र-८५६

ग्रामपंचायत क्षेत्र-२२५१

बरे झालेली रुग्णसंख्या-२११२

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू- ३६

उपचाराखालील रुग्ण- ९५९

CCC येथे दाखल-११

DCHC येथे दाखल-२३

DCH येथे दाखल-०२

खासगी रुग्णालयात दाखल-३३

गृह विलगीकरणात असलेले-८९०

फोटो - ०४ देवळा १

वाजगाव येथे होम क्वाॅरंटाईन रुग्णाला घराबाहेर न पडण्याची सूचना देताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

===Photopath===

040421\04nsk_35_04042021_13.jpg

===Caption===

वाजगाव येथे होम क्वॉरण्टाईन रुग्णाला घराबाहेर न पडण्याची सुचना देतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

Web Title: Increased corona prevalence through free movement of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.