मुंबईनाका भागात वाढली गुन्हेगारी ; टवाळखोरांचे पोलिसांना आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:23 PM2020-07-25T17:23:12+5:302020-07-25T17:25:12+5:30

गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले आहे.. त्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून टवाळखोरांनी पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे  आव्हान उभे केले आहे.

Increased crime in Mumbai area; Thieves challenge police | मुंबईनाका भागात वाढली गुन्हेगारी ; टवाळखोरांचे पोलिसांना आव्हान 

मुंबईनाका भागात वाढली गुन्हेगारी ; टवाळखोरांचे पोलिसांना आव्हान 

Next
ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ घरफोडी, दुकाने फोडण्याचे गुन्हे वाढले

नाशिक : कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले ओहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून  टवाळखोरांनी पोलिसांसमोर वाढती गुन्हेगारी रोखण्याचे  आव्हान उभे केले आहे.
मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरांचे प्रमाण वाढले असून याचा परिमाण या भागातील गुन्हेगारी वाढण्याच्या स्वरुपात झाल्याचे दिसून येत आहे.  गोविंदनगर भागात गुरुवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाच ते शुक्रवारी सकाळी साडसहा वाजेदरम्यान मार्क मॉल सुपरमार्के ट येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्के टचे बंद शटर वाकवून कॅश काउंटरमधून २ लाख ४८ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली.  या प्रकरणी सुपर मार्केटचे मालक उंटवाडीतील जगतापनगर येथील  जितेंद्र मेतकर यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तर खोडेनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गजानन अपार्टमेंटमधील एका घराची बेल वाजविण्याच्या कारणावरून कुरापत काढून चाकूचा हल्ला केल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रवींद्र म्हात्रे यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी व त्यांची पत्नी यांना संशयित आरोपी विजय भिवसान कागणे याने धक्का बुक्की करून अर्वाच्च भाषत दमदाटीही केली. तसेच भिवसान याने म्हात्र यांच्या डाव्या बाजूस कमरेजवळ चाकूने मारून दुखापतही केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशाप्रकारे मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करणारांचे धाडस वाढले असून रात्रीच्या वेळेस शहरात संचार बंदी असतानाही घरफोडी करणारे आणि दुकाने फोडणारे पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत आहे.
 

Web Title: Increased crime in Mumbai area; Thieves challenge police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.