वाढीव दराने खत विक्र ी; परवाने रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:13 AM2019-07-26T01:13:46+5:302019-07-26T01:14:24+5:30

येवला : वाढीव दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून, शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उचलणाºया दोषी कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख यांच्याकडे केली आहे.

Increased fertilizer sales; Order for revocation of licenses | वाढीव दराने खत विक्र ी; परवाने रद्द करण्याची मागणी

सहायक गटविकास अधिकारी देशमुख यांना निवेदन देताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी व शेतकरी.

Next
ठळक मुद्दे शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होणार आहे.

येवला : वाढीव दराने खतांची विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून, शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा उचलणाºया दोषी कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रात अवाजवी किमतीत खते विक्री करून खतांची एकप्रकारे तस्करी केली जात आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने मका व कपाशी ही नगदी पिके घेतली जातात; परंतु सध्या कपाशी या पिकावर बोंड अळी तर मका या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यंदा जनावरांना चारा होतो की नाही याची चिंता शेतकरी बांधवांना आहे. त्यात शेतकºयांना खते गरजेची असल्याने खत योग्य किमतीत न मिळाल्यास शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होणार आहे.
पिकांना आता खतांची अत्यंत गरज असल्याने कृषी सेवा केंद्रचालक शेतकºयांची गरज पाहूनच वाजवीपेक्षा अधिक किंमत घेऊन शेतकºयांना आडून पाहत आहे. यात कृषी विभागाचे कर्मचारी गप्प असल्याबद्दल शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील खत विक्री करणाºया संबंधित कृषी सेवा केंद्रात पाहणी करून शिल्लक खतांचा साठा शेतकºयांना योग्य दरात खुला करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे हितेश दाभाडे, भाऊसाहेब कदम, शेतकरी जालिंदर दाभाडे, कचेश्वर काळे, संदीप साळवे आदींसह शेतकºयांच्या सह्या आहेत.

Web Title: Increased fertilizer sales; Order for revocation of licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी