चिकटा या रोगांचे अतिक्र मण वाढल्याने पिक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 02:41 PM2020-02-02T14:41:50+5:302020-02-02T14:42:05+5:30
पाटोदा ( गोरख घुसळे ):- ज्वारीचे पिक हे सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.कणसे दाण्याने भरली आहे.मात्र हवामानातील बदलामुळे या पिकावर प्रचंड मोठया प्रमाणावर मावा व चिकटा या रोगांचे अतिक्र मण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे . दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्यातील शेतकº्यांना निसर्गाच्याच्या लहरीपणामुळे फटका बसत आहे.
सतत वातावरणातील बदलामुळे सर्वच पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले असल्याने कोणत्याही औषधांची मात्रा लागू पडत नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.ज्वारी पिकावर मोठया प्रमाणावर तांबूस फिकट रंगाचा मावा रोग पडला आहे.तर ज्वारीवरील मावा व चिकटा विषारी असून कणसातील ज्वारी खाण्यायोग्य नसून कडबाही जनावरांना चारणे हानिकारक असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली . वातावरणातील बदलामुळे ज्वारी पिकावर एवढया मोठया प्रमाणावर मावा व चिकटा पडला आहे. कणसावर पडलेल्या मावा व चिकट्याने संपूर्ण कणीस हे काळे पडले असून त्यातील धान्य खराब होत आहे.गेल्या अनेक वर्षात इतक्या मोठया प्रमाणात ज्वारी पिकावर मावा व चिकटा रोग पडला नसल्याची माहिती शेतकरी वर्गाने दिली आहे.खरीप हंगामात अवकाळी पावसाने शेतातील सर्वच पिके खराब झाल्याने जनावरांच्या चाº्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील बहुतेक शेतकºयांनी जनावरांच्या चाº्यासाठी कडबा उपलब्ध होईल म्हणून गावठी मालदांडी ज्वारीची लागवड करण्यास प्राधान्य देत मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली आहे. पिक मोठे होऊन आता कडबा व धान्य उपलब्ध होईल या आशेवर असलेल्या शेतकº्यांची निसर्गाने घोर निराशा केली आहे.पिकावर मावा तसेच चिकटा पडल्याने संपूर्ण पिकच धोक्यात आले आहे.शेतकº्यांपुढे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.