सातपूर परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:31 AM2018-12-25T00:31:22+5:302018-12-25T00:31:45+5:30
परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अवैध धंदे वाढल्याने येथील महिलांनी पोस्टाद्वारे पोलीस महासंचालकांना निवेदन रवाना केले आहे.
सातपूर: परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अवैध धंदे वाढल्याने येथील महिलांनी पोस्टाद्वारे पोलीस महासंचालकांना निवेदन रवाना केले आहे. सातपूर भागात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे येथील नागरिक जेरीस आले आहेत. गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून महिला, मुलांना त्रास दिला जात असल्याने येथील महिलांनी एकत्र येत निवेदन तयार करून थेट पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविले आहे. या अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस प्रशासनाकडून याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. राजरोसपणे मटका, जुगार खेळण्यासाठी येथे गुंडांची गर्दी जमलेली असते. नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना विशेषत: महिला, तरुणींना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. निवेदनावर येथील रहिवासी महिलांच्या स्वाक्षºया आहेत.
मटके, जुगार अड्डे
याठिकाणी अनेकदा अश्लील वर्तन, शिवीगाळ यांसारख्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याबाबत येथील महिलांनी व नागरिकांनी स्थानिक पोलिसांत तक्र ारदेखील केली असून, त्याची दखल घेतली जात नाही. तसेच मटके व जुगार चालविण्यासाठी येथील धंदेचालक गुंडप्रवृत्तीची माणसे हाती धरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.