साथरोगाच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:39+5:302021-07-07T04:16:39+5:30

---------------------- फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल नांदूरशिंगोटे : पारंपरिक शेती आता फारशी परवडत नसल्याने शेतकऱ्यांना फळबागा हा चांगला पर्याय आहे. ...

Increased incidence of communicable diseases | साथरोगाच्या प्रमाणात वाढ

साथरोगाच्या प्रमाणात वाढ

Next

----------------------

फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

नांदूरशिंगोटे : पारंपरिक शेती आता फारशी परवडत नसल्याने शेतकऱ्यांना फळबागा हा चांगला पर्याय आहे. शिवाय त्यात आंतरपिके सुद्धा घेता येतात. दीर्घकाळ उत्पन्न म्हणून फळबागा एक चांगला पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पिकांचे नियोजन करता येते.

--------------------

पेरणीनंतर पुन्हा पावसाचा खंड

नांदूरशिंगोटे : परिसरात जून महिना जवळपास कोरडा गेल्याने शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच पेरणीला महिनाभर उशीर झाला आहे. वरुण राजा वेळेवर हजेरी लावत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

--------------------

नांदूरशिंगोटेत १०० नागरिकांना दुसरा डोस

नांदूरशिंगोटे : येथे ४५ वर्षापुढील १०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला. सुमारे तीन महिन्यापूर्वी आरोग्य विभागाने येथील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून दुसऱ्या डोसची प्रतीक्षा होती. प्रशासनाने पाठपुरावा केल्याने येथे लस उपलब्ध करून देण्यात आली.

-----------------------

बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

नांदूरशिंगोटे : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसाने बसस्थानकाच्या आवारात खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बसचालकांना आत प्रवेश करताना खड्ड्यांचा सामना करावा लागतो.

------------------------

नांदूरशिंगोटे परिसरात उन्हाची तीव्रता

नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या आठ दिवसापासून ऐन पावसाळ्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. सकाळपासूनच उन्हाचा चटका लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त असून पिके पिवळी पडू लागली आहे. दिवसभर कडक ऊन तर सायंकाळी गारवा यामुळे वातावरणात बदल घडून येत आहे.

Web Title: Increased incidence of communicable diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.