पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा वाढला उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:28 PM2020-01-08T23:28:47+5:302020-01-08T23:29:20+5:30
झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मालेगाव : शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सोयगावसह जिजामाता उद्यान, कॉलन्यांमधील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यावर शेवाळ पसरले असून, त्यात नागरिक टाकत असलेल्या कचऱ्याची भर पडत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे; मात्र महापालिकेच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. दोन ते तीन महिने उलटूनही परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही. सायंकाळच्या वेळेस डास व मच्छरांचा उपद्रव वाढत असतो. परतीच्या पावसामुळे अनेक मोकळ्या भूखंडांवर गाजर गवताबरोबरच इतर गवत वाढले आहे. डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर नागरिक कचरा टाकत असल्याने मोठे ढिगारे साचले आहेत. या घाण-कचरा व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थी व वृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी करावी तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. दिवसागणिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. डी.के. चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानात अजूनही पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना उद्यानात जाता येत नाही. उद्यानातील साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांची उत्पत्ती होत आहे. या भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. उद्यान असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. उद्यानातील पाण्याचा निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच महापालिका प्रशासनाने नववसाहत भागातील कॉलन्यांकडे लक्ष देऊन धुरळणी व डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.
कॉलन्यांमधील रहिवाशी हतबल
परतीच्या पावसामुळे कॉलन्यांना जोडणाºया रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच रस्ते उखडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात तर मोकळ्या भूखंडांवर घाण, कचरा व पावसाचे डबके साचले आहेत. गटारी नसल्याने पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. महापालिकेच्या प्रभाग व मुख्य कार्यालयात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात फवारणी झालेली नाही. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकही मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकतात. त्यामुळे रोगराई पसरत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- दिव्येश बोरसे, नागरिक
महापालिकेला सर्वाधिक महसूल मिळवून देणाºया सोयगाव व नववसाहत कॉलनींच्या नागरी सुविधांकडे मनपा प्रशासनाने सर्रास दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, गटार या मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डास, मच्छरांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे.
- प्रितेश शर्मा, नागरिक